Top News

“राज्यपालांनी अर्णब गोस्वामींची चिंता करु नये, सरकार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतय”

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीये.

छगन भुजबळ यांनी भगतसिंह कोश्यारी यांना काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. नाशिक येथील पत्रकारपरिषदेत छगन भुजबळ बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार’; सुसाईड नोट लिहीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

“आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो नाही ही खरंच शरमेची गोष्ट”

‘त्या’ वक्तव्यावर खडसेंनी माफी मागावी अन्यथा…; ब्राम्हण महासंघाचा इशारा

राज्यपाल कोश्यारींचा गृहमंत्र्यांना फोन; अर्णब गोस्वामींच्या प्रकृती आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त

‘ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या’; मुंबई पालिकेचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या