बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शाहरुख खानने भाजपत प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील”

बीड | सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पीठ सापडलं असं म्हणतील. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम सुरू आहे, अशी टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते  बीडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

मी बांधलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मिटिंग घेत होते. या घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले. 100 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप झाले. 100 कोटीचा ठेका घेऊन 850 कोटींची लाच कोणी देईल का?, असं छगन भुजबळांनी सांगितलं.

मी आणि समीर अडीच वर्षे आत होतो. आमच्या घरावर 17 वेळी धाडी पडल्या. धाडी पडल्या की आमच्या पत्नी, मुले घाबरून मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळ विचित्र होता. दिवसभर मॉलमध्ये राहायचं आणि रात्री घरी जायचे, असंही भुजबळांनी सांगितलं. तसेच बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये जेव्हा आलो तेव्हा माझे जंगी स्वागत करण्यात आलं. या जनतेचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. या प्रेमाचा उतराई कसा होऊ हे कळत नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होतं. मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात. भाजपचे राहुल रमेश वाघ ,भाजप धुळे जिल्हा सरचिटणीस हे अध्यादेशाच्या विरुद्ध कोर्टात गेले आहेत, असं भुजबळ म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू”

पाकिस्तान टीम इंडियाला नक्की हरवणार- इम्रान खान

‘…तर आम्हाला थेट मॅसेज करा’; पाकिस्तान टीमसाठी झोमॅटोचं ट्विट

‘या’ तारखेपासून पुन्हा पाऊस बरसणार; शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

‘…तर पुन्हा कोरोनाची भयावह लाट येऊ शकते’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More