नाशिक | वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोवा बार काउंसिल आणि नाशिक बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वकिल परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ बोलत होते.
कोर्टात एखादे वकिल मोठ्याने बोलतात तर कोणी हळू बोलतं. मात्र सिनेमात जशी मजा दाखवली जाते तशी मला कोर्टात दिसली नाही. सत्य बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करतो तोच मोठा वकील, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
देशातील काही भागामध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात चिडफाड होत आहे. ते गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी लोकांना त्रास होत आहे. सामान्य माणसाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सर्वच मंत्री चांगले नसतात, सर्वच वाईटही नसतात. मात्र जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही नक्की करणार, असंही भुजबळांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
…तर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी- देवेंद्र फडणवीस
“एनआयएच्या तपासातून सत्य बाहेर येईल म्हणून शरद पवार घाबरले आहेत”
महत्वाच्या बातम्या-
आबांनी कधीच कुणाचं मन दुखावलं नाही- अजित पवार
“भुंकणारे भुंकत राहतील पण आपण आपलं कीर्तन बंद करु नका”
कीर्तन-प्रवचन सोडणार?; अखेर इंदुरीकर महाराजांनी घेतला मोठा निर्णय
Comments are closed.