महाराष्ट्र मुंबई

राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील- छगन भुजबळ

मुंबई | राज्यपाल समजूतदार आहेत. विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत ते योग्य निर्णय घेतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलंय. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सरकारने राज्यपालांकडे आमदारकीसाठी पाठवलेली सर्व नावे योग्य आहेत. सर्व निकषांचे पालन करूनच ही नावे निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आता राज्यपाल यावर निर्णय घेतील, असं भुजबळ म्हणालेत.

सरकारने निश्चित केलेल्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याने दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

आयसीसीचा मोठा निर्णय! ‘या’ वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिके

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलारांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या