पुणे महाराष्ट्र

“मंत्रालयात झारीतले शुक्रराचार्य खूप, OBC आरक्षणावर गदा येत असेल तर लढावंच लागेल”

पुणे | मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येतात. तसेच ओबीसी आरक्षणावर गदा येत असेल तर त्यासाठी लढावंच लागेल, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त छगन भुजबळ भिडेवाड्यात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरक्षणाच्या दुसऱ्या कायद्याला भुजबळांनी पाठिंबा दिला. तसेच आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात जाणं हे काही नवीन नाही, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय.

मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचं आरक्षण जैसे थे राहिलं पाहिजे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. कधी नव्हता. मराठा समाजाला त्यांचं आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“फडणवीस साहेब, तुमच्या धमक्यांचे व्हिडीओ बाहेर काढायला लावू नका”

…म्हणून ग्लेन मॅक्सवेलने मागितली केएल राहुलची माफी

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘या’ महिन्यात;वर्षा गायकवाड यांची माहिती

ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’; देवेंद्र फडणवीसांची टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या