बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून मराठा आरक्षणाचे स्वागत- छगन भुजबळ

मुंबई | ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धोका नसल्याने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचे आम्ही स्वागत करतो, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

आघाडी सरकानेही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. आता त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाल्याने आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मराठा समाजाच्या आरक्षणामुळे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर परिणाम होईल असं बोललं जात होतं. मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयाने इतर मागासवर्गीयांवर अन्याय होत नसल्याचं स्पष्ट झालंय, असं भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठा समाजाचं आरक्षण कादयेशीर कसोटीवर सिद्ध झाल्याने त्याचं स्वागत करत असल्याचं भुजबळांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन यशस्वी”

-केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्येही मराठा आरक्षण लागू झालं पाहिजे- हर्षवर्धन जाधव

-…म्हणून भारतीय संघ बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध मुद्दाम हरेल!

-अजित पवारांची सावली असलेला ‘हा’ नेता राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत

-…म्हणून महेंद्रसिंग धोनीचं होतंय जोरदार कौतुक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More