पुणे | पुण्याजवळच्या चाकणमध्ये सोमवारी असंख्य वाहनं जाळण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मराठा क्रांती मोर्चाने आपल्या मागण्यांसाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंदोलन सुरु केलं होतं. 2 तासांनंतर तोडफोडीला सुरुवात झाली आणि त्यानंतर वाहनांना आगी लावण्यात आल्या.
धक्कादायक बाब म्हणजे या जाळपोळसत्रात बाहेरच्या लोकांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस याप्रकरणी व्हायरल फोटो, व्हीडिओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-उद्धव ठाकरेंनी नाकारली मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणाऱ्या आमदाराची भेट!
-आरक्षणासाठी काँग्रसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा!
-शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतात!
-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराने काढला नवीन पक्ष
-राज आणि उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला विरोध- नारायण राणे