बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ट्विट करणाऱ्यांचे संस्कार महाराष्ट्राला कळले’, चाकणकरांचं प्रत्युत्तर

पुणे | आज सकाळपासून काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील टीका करताना चाकणकर यांचा उल्लेख शूर्पणखा असा केला होता.

चाकणकर विरुद्ध वाघ असा वाद नेहमीच काही ना काही कारणाने रंगत असल्याचं पाहायला मिळत असतं. त्यातच चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेवर रुपाली चाकणकर यांनी देखील आता स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना या क्षुल्लक गोष्टींना फारसं महत्त्व देणे गरजेचे वाटत नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांना अध्यक्षपदाबाबत कोणतीही पूर्वकल्पना किंवा विचारणा करण्यात आलेली नसून पक्षातर्फेही कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच ट्विट करणार यांचे संस्कार महाराष्ट्राला समजले असे देखील प्रत्युत्तर त्यांनी चित्रा वाघ यांना दिलं आहे.

दरम्यान, कुणी काय बोलावं? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपल्याला आपलं काम आणि जबाबदारी आहे त्यामुळे तिकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी चित्रा वाघ यांच्या त्या ट्विटवर फार काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

थोडक्यात बातम्या – 

“एनसीबी एवढी मोठी एजन्सी पण गांजा आणि तंबाखूतील फरक कळत नाही”

‘औरंगजेबाच्या औलादी आहेत या पक्षात’; राष्ट्रवादी आमदाराच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे निलेश राणे संतापले

आयपीएल दरम्यान मराठी स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट ‘महास्पोर्ट्स’ला जबरदस्त प्रतिसाद

विमानाचं इंधन होणार स्वस्त; ‘या’ राज्याकडून करामध्ये मोठी कपात

देशातील कोरोना रूग्णांसह मृतांच्या संख्येतही वाढ, पाहा ताजी आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More