Top News महाराष्ट्र मुंबई

धनगर आरक्षणासाठी 16 ऑक्टोबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन

मुंबई | धनगर समजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने येत्या 16 ऑक्टोबर रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली.

धनगर आरक्षण लढा समन्वय समितीची राज्यव्यापी बैठक आज लोणावळ्यात पार पडली. या बैठकीला राज्यभरातून सकल धनगर समाजाचे 200 प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठा आरक्षणाला स्थगिती असताना देखील सरकार अद्यादेश काढून समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. मग धनगर समाजाला अध्यादेश काढून आरक्षण का दिलं जात नाही. सरकार धनगर समाजावर अन्याय करत आहे. एकाला एक न्याय व दुसर्‍याला दुसरा न्याय हा प्रकार या राज्यात चालणार नाही, असं प्रकाश शेंडगे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

भाजपचा सीबीआयवरही विश्वास उरला नसेल तर…- संजय राऊत

साडेसहा महिन्यांनी सलमानच्या ‘राधे’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही- यशोमती ठाकूर

कोरोना लस कधी मिळणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या