‘थुकरटवाडी’च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, ‘चला हवा येऊ द्या’ बंद होणार!

मुंबई | प्रेक्षकांच्या आवडीचा, खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम ‘चला हवा येउ द्या’ निरोप घेणार आहे. असं या कार्यक्रमाचा होस्ट निलेश साबळे याने सांगितलं.

‘चला हवा येऊ द्या’मधील थुकरटवाडीतील मंडळी श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे यांनी प्रेक्षकांना खूप हसवलं आणि प्रेक्षकांनीही त्यांना डोक्यावर घेतलं.

दरम्यान, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिनेमांना, मालिकांना, तसेच कलाकारांना प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं होत.