“मतदारांना धमकावून विजय?”; नारायण राणेंच्या खासदारकीला थेट हायकोर्टात आव्हान

Narayan Rane | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागून आता बरेच दिवस झाले आहेत. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात  सरकार स्थापन देखील झालं आहे. मात्र, महाराष्ट्रात काही ठिकाणी अजूनही पराभूत उमेदवारांना त्यांचा पराजय पचवता आला नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच नगरचे भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्या विजयावर आक्षेप घेतला होता. अशात आता नारायण राणे (Narayan Rane ) यांच्या विजयावरही आक्षेप घेण्यात आला आहे.

भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी (Vinayak Raut) दाखल केली आहे. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. नारायण राणेंचा 47858 मतांनी विजय झाला. मात्र, राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्याने केला आहे. याबाबत त्यांनी याचिका देखील केली आहे.

विनायक राऊत यांनी केली याचिका दाखल

मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राणे यांचा विजय रद्द करून निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या,अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक काळात भाजपकडून (Narayan Rane ) अनेक गैरप्रकार करण्यात आले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी देखील करण्यात आल्या. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही म्हणून ही याचिका करण्यात आली असल्याचं विनायक राऊत म्हणाले आहेत.

दाखल याचिकेत नेमकं काय?

विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच (Narayan Rane ) मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचा देखील दावा याचिकेत करण्यात आला आहे.

News Title –  Challenge to Narayan Rane MP in High Court

महत्वाच्या बातम्या-

“प्रत्येक आमदाराला 5 कोटींची ऑफर आणि..”; विधान परिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांचा दावा

कोट्यवधींचे दागिने, सोन्याचा लेहंगा..राधिकाच्या राजेशाही थाटाची एकच चर्चा; किंमत ऐकून चक्रावून जाल

अनंत-राधिका अडकले विवाहबंधनात; लग्नाचा पहिला फोटो आला समोर 

…अन् हे संविधान वाचवणार?, मतं फुटल्याने प्रकाश आंबेडकरांची कॉँग्रेसवर टीका

आज ‘या’ राशीचे लोक होतील मालामाल!