बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

मुंबई | रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्याता बंगळुरूने रोमांचक विजय मिळवला आहे. श्रीकर भरत याने आवेश खानच्या अखेरच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराच्या जोरावर दिल्लीच्या हातातोंडाशी आलेला सामना हिसकावून घेतला.

अखेरच्या षटकात बंगळुरू संघाला 15 धावांची गरज होती. त्यावेळी मैदानावर ग्लेन मॅक्लवेल आणि श्रीकर भरत होते. पहिल्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार लगावला, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या तिसऱ्या चेंडूवर लेगबायचा 1, चौथा चेंडू निर्धाव तर पाचव्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि अखेरच्या चेंडूवर पाच हव्या धावा असताना भरतने षटकार खेचला आणि संघाला विजय मिळवून दिला.

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना बंगळूरूला 165 धावांचं आव्हान दिलं. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी अनुुक्रमे 48 आणि 43 धावांची खेळी करत समाधानकारक सुरूवात केली. त्यानंतर हेटमायरने आक्रमक फलंदाजी केली आणि एक समाधानकारक आव्हान विराटसेनेला दिलं.

दरम्यान, बंगळुरू फलंदाजीला आल्यावर त्यांची सुरूवात निराशाजनक झाली. देवदत्त शून्यावर आणि विराट कोहली अवघ्या 4 धाावांवर परतला. त्यामुळे बंगळुरू संघ अडचणीत आला होता. मात्र मॅक्सवेल आणि श्रीकर भरतने दमदार फलंदाजी करत सामना संघाच्या बाजुने झुकवला.

 

 

थोडक्यात बातम्या- 

असं काय झालं की, रतन टाटांना आली जेआरडी टाटांची आठवण!

“वसूली आली की सरकारचा ससा होतो अन् शेतकऱ्यांना मदत म्हटलं की कासव”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची आकडेवारी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमारकडे काॅंग्रेसने दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी!

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधीक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More