महाराष्ट्र सातारा

लोकशाहीत सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार, शिवसेनेनं ते खोडावेत- चंद्रकांत पाटील

सातारा | लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार आहेत, त्यांनी ते खोडावेत, असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

साताऱ्यात भाजप पदवीधर उमेदवार मेळावा पार पडला. यावेळी पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

किरीट सोमय्या यांनी कराराचे पेपर काढले आहेत, ते खोटे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. लोकशाहीत किरीट सोमय्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते खोडावेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

या महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का?, असा सवाल करत आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायला मिळणार की नाही. मंदिरासाठी संत महंतांनी आंदोलन केले की अटक करून कलमे लावली जातात.. शेतकऱ्यांनी झुणका भाकर आंदोलनास परवानगी मागितली तर नाकारण्यात आली, यामुळे महाराष्ट्र शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही- नितीश कुमार

“सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, शॉक दिल्याशिवाय बेताल बडबड थांबणार नाही” 

सो हे शिखंडी, केवळ साडी नेसवणं बाकी; किशोरी पेडणेकरांची बोचरी टीका 

“उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर 345 कोटी बिल्डरला गिफ्ट दिले”

“ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या