बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मोठी मागणी!

Champion Trophy 2025 | भारत विरूद्ध पाकिस्तान हे दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. मात्र दोन्ही संघांमध्ये भारत हा आगेकुच करताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या टी 20 विश्वचषकात भारताने पाकिस्तान संघाला धूळ चारली होती. तसेच टीम इंडिया टी-20 विश्वचषकातील विजयी संघ आहे. 2025 या आगामी वर्षात पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champion Trophy 2025) होणार आहे. मात्र याबाबत आता बीसीसीआयने मोठा निर्णय़ घेतला आहे.

बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान देश हा आतंकवाद्यांना पाठिंबा देणारा देश असल्याचं बोललं जातं. यामुळे टीम इंडिया या संघाला पाकिस्तानमध्ये खेळवलं जाणार नसल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयचा निर्णय ऐकताच पाकिस्तानने आता वेगळी चाल खेळली आहे.

लेखी मागणी द्यावी

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे पुरावा मागितला आहे. जर भारत सरकारकडून परवानगी नाही तर आयसीसीकडे तसं लेखी द्यावं, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे केली. भारत सरकारला सुरक्षेच्या मुद्द्यावरून टीम इंडियाला ही गोष्ट पटत नाही, यामुळे पाकिस्तानने हे प्रकरण लवकरात सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहे. (Champion Trophy 2025)

आयसीसीची वार्षिक बैठक 19 जुलैला कोलंबो येथे होईल. बीसीसीआय टीम इंडियाला हायब्रिड मॉडेलनुसार भारतीय संघाचे सामने यूएईत खेळण्यावर भर देईल. आशिया कप स्पर्धाही हायब्रिड मॉडेलवर खेळवली गेली होती. त्यावेळी टीम इंडिया श्रीलंकेत सामना खेळत होती. (Champion Trophy 2025)

पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champion Trophy 2025) स्वरूप हे आयसीसीकडे दिलं आहे. यात भारतीय संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये होतील हे असं आलं आहे. यात उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना लाहोरमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली. या स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होईल.

भारत आणि पाकिस्तान सामना 1 मार्च रोजी होणार

भारत आणि पाकिस्तान हा सामना हा 1 मार्च रोजी होणार आहे. अंतिम सामना हा 9 मार्च रोजी होणार आहे. भारतीय संघाने काही वर्षांआधी म्हणजेच 2008 या वर्षात शेवटचा पाकिस्तान दौरा केला. त्यानंतर मुंबईच्या ताज हॉटेल हल्ला केला. तेव्हापासून भारतीय संघ पाकिस्तानात गेलेला नाही. मात्र पाकिस्तान संघ हा भारतात आला होता.

News Title – Champion Trophy 2025 India Will Not Go to Pakistan About PCB Demanded BCCI To Give Written To ICC

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका!

“जिथे जातात तिथेच ते XXX खातात”; जरांगेंची पुन्हा एकदा भुजबळांवर सडकून टीका

“पदव्या घेऊन काय होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका”; भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

“आम्ही मंत्री, मुख्यमंत्री झालो म्हणजे तुमच्यापेक्षा..”; छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

तब्बल 46 वर्षांनी जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याचं कुलूप उघडलं; धन बघून थक्क व्हाल