पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल शुक्रवारी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये आपण कोल्हापूरला जाणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून पाटलांवर विरोधी नेत्यांनी निशाणा साधला. त्यानंतर पुन्हा पाटलांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांना एक सवाल केला आहे.
माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये किंवा घाबरून जाऊ नये. माझं जे मिशन आहे ते पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले. त्यासोबतच पवारांच्या टोल्याला प्रत्युत्तर देताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनंतर अजित पवारांना काय स्थान राहील, असा सवाल पाटलांनी केला आहे.
अजित पवारांना काय पडलंय आमचं?, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. मला माझा पक्ष काय म्हणतो हे महत्त्वाचं असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, 1980 ते 1993 या काळात मी घर सोडलं होतं. केंद्राने मला सहजासहजी पाठवलं नसून जे मिशन दिलं आहे हे ते पुर्ण करून आपण कोल्हापूरला जाणार असल्याचंही पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“सत्ता कोणाच्या बापाच्या मालकीची नसते, जोपर्यंत भाजपची जिरवत नाही तोपर्यंत आम्ही तिघे एकत्र”
“शरद पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संजय राऊतांनीच आग्रह करावा”
‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलासा
‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत
दिल्लीतील काही लोकं टोमणे मारून माझा अपमान करतात- पंतप्रधान