Chanakya Niti | भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे आजही पाळली जातात. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.
चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.
चाणक्य आपल्या नीतीशास्त्रामध्ये म्हणतात की, व्यक्तीने संकट काळात काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे. यामुळे तो मोठ्यातल्या मोठ्या संकटातूनही बाहेर पडू शकतो. त्याने फक्त या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
संकट काळात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
ठोस रणनीती का तयार करा : तुमच्या वाईट काळात तुम्ही ठोस धोरण तयार केले पाहिजे. या या धोरणाद्वारे योग्य निर्णयापर्यंत पोहोचणे सोपे होते. योजनेनुसार कार्य केले तर, यश नक्कीच मिळते.
पैशाचे व्यवस्थापन : माणसाने नेहमी पैशाची बचत करावी, ही बचत नेहमीच वाईट काळात कामी येते. चाणक्य यांच्या तत्वज्ञानानुसार पैशाचे योग्य व्यवस्थापन केले तर व्यक्ती सर्वात मोठ्या संकटातूनही बाहेर पडू शकते.
आरोग्याकडे लक्ष द्या : मनुष्याचे आरोग्य जर चांगले असेल तर त्याला कोणत्याही अडचणीमध्ये उभं राहण्यासाठी ऊर्जा मिळते. संकटाच्या परिस्थितीत आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. निरोगी राहिल्यास वाईट काळातून बाहेर पडू शकाल. याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल.
कुटुंबाची काळजी घ्या : वाईट काळात कुटुंब तुमची ढाल बनून उभे असते.त्यामुळे कोणताही निर्णय अत्यंत सावधगिरीने घेतला पाहिजे. त्याचा प्रभाव कसा असेल, याकडे नेहमीच लक्ष केंद्रित केले पाहिजे. कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.
News Title- Chanakya Niti for Crisis period
महत्वाच्या बातम्या-
रात्री झोपण्यापूर्वी दूध पित असाल तर आत्ताच बंद करा; होऊ शकतात गंभीर आजार
शेतकऱ्यांच्या पोटात आनंद मावेना, मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर
अभिनेत्री छाया कदम यांची आईसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट, “आई तु आज हवी होतीस…”
“…वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत”, ईव्हीएम मशीन बंद असल्याने आदेश बांदेकरांचा संताप