लग्न करायचं तर ‘अशा’ मुलींसोबतच करा; भाग्यही उजळेल आणि कायम आनंदी राहाल

Chanakya Niti | भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे आजही पाळली जातात. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.

चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर (Chanakya Niti )सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.

चाणक्य (Chanakya Niti ) यांनी नीती शास्त्रात सांगितले आहे की, कोणत्या स्त्रीशी विवाह केल्यास पुरुषाचे जीवन सुखी होते. आचार्य चाणक्य यांच्यानुसार ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतात, त्यांच्याशी विवाह करणाऱ्या व्यक्तीचे झोपलेले भाग्यही जागृत होते.

‘अशा’ मुली आयुष्यभरासाठी साथ देतात

काळजी घेणारी : पुरुषाच्या आयुष्यात अशा व्यक्तीची गरज असते, जी त्याची काळजी घेईल. जी स्त्री आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करते आणि नेहमी आपल्या जोडीदाराची काळजी घेते, तिच्याशी पुरुषाने नेहमी खरेपणाने वागावे.

मनाचं सौंदर्य ओळखणारी : चाणक्य म्हणतात की, आपल्या मनाच्या सौंदर्याला महत्त्व देणाऱ्या (Chanakya Niti ) स्त्रीशी लग्न करावे. काळाच्या ओघात बाह्य सौंदर्य नष्ट होऊ जाते. पण, मनाचे सौंदर्य कायम राहते. तुमचं मन जपणारी आणि तुमचं मन ओळखणाऱ्या मुलीशी लग्न करायला हवं.

मोठ्यांचा आदर : जी स्त्री मोठ्यांचा आदर करते, त्यांना समजून घेते. मोठ्यांच्या गरज पूर्ण करते ती एक उत्तम गृहलक्ष्मी बनते. त्यामुळे तिच्याशी विवाह करणे भाग्यवान ठरते.

धार्मिक स्त्री : आचार्य चाणक्य यांच्यानुसार धार्मिक (Chanakya Niti ) असलेल्या महिलेशी लग्न केल्याने व्यक्तीचे झोपलेले भाग्यही जागृत होते. धार्मिक व्यक्ती कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही.

News Title- Chanakya Niti for Life partner

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात श्रेयचोरांचा सुळसुळाट!, रोहित पवार आणि रवींद्र धंगेकरांचा उल्लेख

“आपण पुन्हा एकत्र यायला हवं”, संजय राऊतांची महायुतीच्या नेत्यांशी गळाभेट; राजकीय वर्तुळात एकच चर्चा

“स्मृती इराणी यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणं बंद करा”; राहुल गांधींनी ट्वीट करत केलं आवाहन

सारा नाही तर ‘या’ अभिनेत्रीशी करणार शुभमन गिल लग्न?, चर्चेला उधाण

प्री-वेडिंगवरच हजार कोटी उडवले, लग्नासाठी तर तब्बल..; अंबानींच्या लग्नातील खर्चाचा आकडा समोर