Chanakya Niti | भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे आजही पाळली जातात. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय (Chanakya Niti )राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.
चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर (Chanakya Niti )सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.
चाणक्य (Chanakya Niti )आपल्या नीती शास्त्रामध्ये म्हणतात की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नुसतं पैशाच्या मागे धावू नका. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. जीवनात काय करावे आणि काय करू नये, याची जाणीव असायला हवी. याचे पालन केले तर, व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो.
कायम पैसा-पैसा करू नका
जगण्यात समाधान शोधा : चाणक्य म्हणतात की, आयुष्यात समाधान शोधा. कायम पैशांच्या मागे पळाल तर, जीवनातून समाधान निघून जाईल. आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल आभारी असणे हेच खरे धन आहे.
पैशांची लालसा सोडा : आजकाल (Chanakya Niti )अनेक लोक पैसा कमवण्याच्या नादात इतके व्यस्त असतात की त्यांना आपल्या कुटुंबासाठी वेळच मिळत नाही.यामुळे ते पैसे तर कमवतात पण कुटुंबापासून दूर होतात. मित्रांपासून दूर होतात. म्हणून पैशांची अती लालसा सोडा.
पैसा साधन आहे उद्देश नाही : पैसा आपल्याला आपले उद्देश्य साध्य करण्यास मदत करू शकतो, पण तो आपला उद्देश्य असू शकत नाही. आयुष्यात फक्त पैसे कमावणे हा उद्देश नसावा. तर, पैशासोबतच जीवन कसे आनंदी जगता येईल ते बघावे.
समाज सेवा : आपण (Chanakya Niti )ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपली चांगली भावना असायला हवी. आपल्या समजाप्रती काही तरी करण्याची भावना असायला हवी.जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्याला आंतरिक शांती मिळते आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनते.
News Title- Chanakya Niti for satisfied life
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डंका!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
पावसाळ्यातील आजारांपासून एका झटक्यात मिळवा सुटका; ‘हे’ घरगुती उपाय करा
मळमळ, थंड घाम, थकवा अशी लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध; अन्यथा..