Chanakya Niti | भारतीय राजकीय विचारवंत, राजकीय तत्वज्ञानी, राजकीय धोरण निर्माता, शिक्षक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर काही न काही तत्वज्ञान सांगितलं आहे.
जीवनात येणाऱ्या अडचणी असो किंवा जीवनात मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, याबाबत त्यांनी काही तत्वे सांगितली आहे. त्यांच्या या तत्वांचे पालन केले तर जीवनातील कोणत्याही अडचणीतून तुम्ही सहजरीत्या बाहेर पडू शकता.
चाणक्य यांनी जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग करावा असं म्हटलं आहे. तसंच काही गोष्टी कायम लक्षात घ्याव्यात असं ते म्हणतात. चाणक्य यांच्या मते, काही सवयी या मनुष्याच्या विकासाच्या आड येतात. यामुळे यश मिळत नाही. चला तर मग जाणून घेऊया चाणक्य यांनी सांगितलेली 5 मंत्र नेमके कोणते आहेत.
शिस्त बाळगणे :
चाणक्य यांच्या मते मनुष्याला शिस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने नेहमी आपल्या कामाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. त्यांनी इतरांसोबत शिस्तीची भावना राखली पाहिजे. व्यवसाय असा आहे जो एकट्याने करता येत नाही. त्यामुळे तुमच्यात शिस्त आणि टीम वर्कची भावना असायला हवी.
Chanakya Niti | मधुर वाणी :
चाणक्य म्हणतात (Chanakya Niti) की आपली वाणी नेहमी मधुर असायला हवी. म्हणजेच आपल्या बोलण्यात एक आदर असायला हवा. मधुर भाषा तुमचे नाते बनवू शकते किंवा तोडू शकते. त्यामुळे तुमच्या व्यवसायाशी संबंधित लोक असोत किंवा इतर लोक असोत, तुम्ही त्यांच्याशी खूप शांततेने आणि आदराने बोलायला हवे.
सकारात्मक विचार :
आपल्याला व्यवसाय असो किंवा अन्य गोष्टी यश मिळवायचे असेल तर, अगोदर आपले विचार हे सकारात्मक आणि चांगले असायला हवेत. चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही कामात नक्कीच अडथळे येतील, परंतु तुम्ही त्यांना घाबरू नका त्याचा निडरने सामना करा.
अपूर्ण काम ठेऊ नका :
चाणक्य यांच्यामते (Chanakya Niti) कोणतेही काम अपूर्ण सोडू नये. हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम वेळेत पूर्ण करा. यामुळे तुम्हाला तुमची कामे करण्याची सवयही लागेल.
तुमची कमजोरी कोणाला सांगू नका :
आचार्य चाणक्य म्हणतात की, स्वतःची कमजोरी कोणाला सांगू नये. त्रासलेली व्यक्ती अनेकदा आपली कमजोरी आपल्या मित्राला, वर्गमित्राला किंवा सहकाऱ्याला सांगते. त्यामुळे ते त्या कमकुवतपणाचा फायदा घेतात, त्यामुळे भविष्यात तो दुःखी होतो. त्यामुळे आपली कमजोरी सांगू नये.