Chanakya Niti | भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाणारे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली तत्वे आजही पाळली जातात. ते भारतीय राजकारण आणि धर्मशास्त्राचे तज्ञ होते. त्यांनी भारतीय राजकारणाचे नैतिक सिद्धांत स्थापित केले.
चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे आजही जीवनामध्ये उपयुक्त पडतात.त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर (Chanakya Niti )सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन केले तर कोणत्याही समस्यातून बाहेर पडणं अवघड नाहीये. चाणक्य नीती ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनावर खोलवर परिणाम करते.
चाणक्य (Chanakya Niti )आपल्या नीती शास्त्रामध्ये म्हणतात की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही व्यक्तीपासून दूर राहायला हवे. अशा व्यक्तींची संगत ही जीवनावर वाईट परिणाम करते.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर, काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. जीवनात काय करावे आणि काय करू नये, याची जाणीव असायला हवी. याचे पालन केले तर, व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातो. तो यशस्वी होतो. आता असे व्यक्ती म्हणजे नेमके कोण, याबाबत या लेखात सविस्तर माहिती दिली आहे.
‘अशा’ व्यक्तींपासून दूर राहा
खोटी प्रशंसा करणारे लोक : असे लोक तोंडावर (Chanakya Niti )एक आणि मागे एक असं वागतात. असे लोक खोटी प्रशंसा करून तुम्हाला कधीच सत्या पर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळे तुम्ही नेहमी अंधारातच राहता. यामुळे तुम्हाला तुमची कुवत कधीच कळत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींपासून दूर राहायला हवे. असे लोक तुमचं यश पाहू शकत नाहीत.
ज्यांच्या पोटात काहीच टिकत नाही असे लोक : चाणक्य (Chanakya Niti ) म्हणतात की, काही लोकांच्या पोटात काहीच टिकत नाही. अशा लोकांना कधीच आपल्या योजना सांगू नये.असे लोक तुम्हाला तोंडावर पाडू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहायला हवे.
व्यक्तीने नेहमी सज्जन आणि सुशिक्षित व्यक्तींच्या संपर्कात राहायला हवे. असे लोक तुम्हाला नेहमी चांगला मार्ग दाखवतील. ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतील. तसंच, काही मित्रांपासूनही दूर राहायला हवे. काही मित्र हे तुम्हाला कधीच पुढे जाऊन देत नाहीत. त्यामुळे चांगली संगत निवडा.
News Title- Chanakya Niti for successful life
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या पावसाचा मंत्र्यांनाही फटका; ‘या’ नेत्यांनी रेल्वे रूळावरून केला चालत प्रवास
“..तेव्हा तुमचे बाप-दादा इंग्रजांचे तळवे चाटत होते”; जावेद अख्तर भडकले
पुण्यात झिका व्हायरसने घातलयं थैमान; आढळले ‘इतके’ रुग्ण
मुंबईत पावसाचं थैमान! ‘या’ भागांना बसला सर्वाधिक फटका, शाळा-महाविद्यालयातही पाणीच पाणी