Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि कुशल रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. ते आपल्या विवेकबुद्धीने अनेक समस्या सोडवत असत. चाणक्य एक उत्कृष्ट सल्लागार म्हणूनही प्रसिद्ध होते. आजही अनेक लोक आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतात, कारण त्यांची धोरणे योग्य मार्गदर्शन करतात. (Chanakya Niti)
आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक पैलूंवर सखोल विचार करून ‘चाणक्य नीती’ नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य नीतीमध्ये जीवनातील प्रत्येक पैलूचे तपशीलवार वर्णन आहे. वित्त, कुटुंब, नातेसंबंध आणि करिअर इत्यादींशी संबंधित गोष्टींचा त्यात समावेश आहे. यात आर्थिक भरभराटसाठी काय करावे, ते देखील सांगितले आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
सकारात्मक विचार
आचार्य चाणक्य म्हणतात की, आर्थिक तंगी पासून वाचण्यासाठी व्यक्तीचे विचार हे नेहमी सकारात्मक असायला हवे. नकारात्मक विचार मनुष्याला दुर्बल बनवते.त्यामुळे कायम सकारात्मक विचार करून प्रयत्न करावे.
जोखीम
चाणक्य म्हणतात की, जोपर्यंत तुम्ही जीवनात यशस्वी होण्यासाठी जोखीम घेत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा जोखीम घेणेदेखील पुढे जाण्यासाठी महत्त्वाचे असते.
कठोर परिश्र
आपल्या नीतीशास्त्र या ग्रंथात चाणक्य यांनी सांगितले की, व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यक्तीला चांगल्या कर्मसोबतच कठोर परिश्रमाची देखील आवश्यकता असते. कठोर परिश्रम घेतल्यानंतरच यश मिळते आणि धनसंपत्ती मध्ये वाढ होते.
धैर्य
चाणक्य म्हणतात की, धर्यवान व्यक्ती नेहमी यशस्वी होतात. त्यामुळे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तीमध्ये धैर्य असणे देखील आवश्यक आहे.
पैशांची बचत
चाणक्यनीती (Chanakya Niti) आपल्या वेतनातील काही भाग हा बचत करण्यासाठी सांगते. कारण जेणेकरून यामुळे येत्या काळामध्ये बचत केलेले पैसे हे कामाला येतात. जो व्यक्ती बचत करत नाही त्याला सतत आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतं. म्हणून बचत करणे हा मुळ मुद्दा महत्त्वाचा आहे. यामुळे वायफळ वस्तूंवर पैसे खर्च करू नका.