‘अशा’ लोकांपासून चार हात दूरच राहा नाहीतर भिकेला लागाल!

Chanakya Niti | आचार्य चाणक्य (Chanakya Niti) हे एक महान विचारवंत आणि विद्वान होते. त्यांचा अभ्यास हा केवळ भारतापूरता मर्यादित न राहता ते अखंड जगतात पोहोचला आहे. आचार्य चाणक्य यांनी मनुष्याच्या जीवनात अनेक बाबींवर याआधी अनेक वर्षांपूर्वी भाष्य केलं होतं. तसेच त्यांच्या नीतीशास्त्र पुस्तकात मनुष्याच्या आय़ुष्यातील सर्व पैलुंवर देखील भाष्य केलं आहे.

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी मनुष्याच्या जीवनाला कलाटणी देण्याबाबतही अनेक पुस्तकाद्वारे गोष्टी सांगितल्या आहेत. मनुष्याच्या जीवनात असे अनेक लोकं असतात ज्यांच्यापासून चार हात लांब राहा असं आचार्य चाणक्य म्हणतात. यामुळे असे काही लोक आहेत त्यांच्यापासून चार हात लांब राहिल्यास आपण भिकेला लागणार नाहीत, असं चाणक्यनीती सांगते. (Chanakya Niti)

लालची लोकांना चार हात लांब ठेवा

आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) लालची आणि चतूर लोकांपासून चार हात लांब ठेवायला सांगितलं. कारण हे लालची लोकं स्वार्थी असतात. त्यांच्यात लालचीपणा अधिक असतो. एखाद्या वाईट काळात त्यांना मदत मागू नका. ते तुम्हाला मदत करणार नाहीत. ते तुमच्या वाईट कामांवर टपलेले असतात. यामुळे लालची आणि चतूर लोकांना तुमचं चांगलं झालेलं पाहावत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब थांबा. (Chanakya Niti)

स्वार्थ साधणारे मंडळी

स्वार्थी मंडळी हे केवळ स्वत:चा विचार करत असतात. त्यांना इतरांचं काहीही देणंघेणं नसतं. एखाद्या कामापुरते स्वार्थी लोकं केवळ तुमचा वापर करतात. मात्र पुन्हा तुमचे काम करण्यापासून चार हाताचे अंतर ठेवतात. यामुळे आचार्य चाणक्यांनी अशा लोकांपासून चार हात लांबच राहण्यास सांगितलं आहे.

आचार्य चाणक्यांनी रागीट लोकांपासून लांब राहण्यास सांगितलं आहे. रागीट लोकांपासून आपल्याला धोका असू शकतो. कारण रागीट बोलणारी व्यक्ती कधीही कहीही करू शकते. तसेच या रागामुळे तो व्यक्ती स्वत:चे नुकसान तर करतोच त्यासोबत इतरांचेही नुकसान करतो. अनेक लोकांना इतर व्यक्तीच्या पाठीमागे बोलण्याची सवय असते, अशा लोकांपासून चार हात दूर राहा आणि त्यांचे बोलणे टाळा, असं चाणक्यनीती सांगते.

News Title – Chanakya Niti Say Keep Distance this Peoples

महत्त्वाच्या बातम्या

“सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू”; लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा

“मराठा आणि धनगर समाज यांच्यात…”; जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट

बद्रीनाथमधील पातालगंगा टनलजवळ भूस्खलन, राष्ट्रीय महामार्ग झाले बंद; पाहा थरारक Video

वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

“..तरी मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”; वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांचा सवाल