Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती ही केवळ देशापूरती नाहीतर जगासाठी प्रेरणादायी आहे. आचार्य चाणक्यांनी अनेक पिढ्यांना जगण्याचा मंत्र दिला आहे. मनुष्याने आपल्या आयुष्यात कसं राहावं याबाबतही आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे. मात्र आता आचार्य चाणक्यांनी पुरूष आणि महिलांच्या नातेसंबंधांवर त्यांच्या नितीशास्त्रामध्ये माहिती दिली आहे.
आचार्य चाणक्य यांच्या मते महिला ही नेहमी पुरूषापासून संतुष्ट असते तेव्हा ती फार कमी बोलते. याचा अर्थ असा नाही की तिला बोलता येत नाही. ती नवऱ्यापासून खूश असल्याचे संकेत देते. हा त्याचा अर्थ होतो, असं आचार्य चाणक्य (Chanakya Niti) म्हणतात. मात्र पुरूषांच्या बाबतीत याउलट होतं.
महिला परपुरूषाचा विचार करते
जर पुरूष पत्नीसोबत अबोल राहतो तेव्हा पत्नी अस्वस्थ होते. जेव्हा पुरूष महिलेला टाळू लागतो. तेव्हा ती परपुरूषाचा विचार करते. अशावेळी पत्नीला परपुरूष आपलासा आणि हवाहवासा वाटतो. यावेळी दोघा पती-पत्नीने एकत्र बसून एकमेकांच्या मनातील गोष्टींवर भाष्य करावं. यामुळे दाम्पत्यांनी या गोष्टी मिळून सोडवल्या पाहिजेत, असं चाणक्यनीती (Chanakya Niti) सांगते.
पत्नीने पतीचा स्वभाव समजून घेणं
पती-पत्नी हे दोघेही संसाराच्या गाड्याची चाकं असतात. मात्र यातील एका तरी चाकाने दगा दिल्यास संसाराचा चक्काचूर होतो. यामुळे दोघांनी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. जर पत्नी नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमुळे संतापत असेल तर तिच्या मनात असंतोष निर्माण होताना दिसत आहे. अशावेळी पत्नीने पतीचा स्वभाव समजून घेणं गरजेचं आहे.
जर दाम्पत्य आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी जर योग्य निर्णय घेत असेल तर त्यांचं त्यांच्या घरासाठी मोठं योगदान असतं. त्यांच्यातील सामंजस्य मजबूत होत असतं. अशा प्रकारे चाणक्यनीती मोठ्या प्रमाणात समग्र विकासासाठी पारंपारिक सहयोगाला महत्त्व देताना दिसतंय.
News Title – Chanakya Niti | Chanakya Niti Say Why Women Attract To Other Men
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माची अजून एक मोठी घोषणा!
“अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावं, मी मंत्री व्हावं”; पांडुरंगाला कुणी घातलं साकडं?
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासून टोलमाफी
‘जोधा अकबर’ फेम परिधी शर्माचं हटके ट्रांसफॉर्मेशन; फोटो पाहून म्हणाल..
“लाडकी बहीण योजनेची भीक नको, 1500 रूपयांमध्ये संसार होणार आहे का?”