Chanakya Niti | विवाह आणि वय यावरून समाजात अनेकदा चर्चा होताना दिसते. विवाहासाठी योग्य वय किती असावं? तसेच विवाह करताना मुलीच्या वयाबाबतही अनेकदा चर्चा होताना दिसतात. विवाह करताना वय हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुलीचं वय हे मुलापेक्षा कमी आणि मुलीपेक्षा नवऱ्या मुलाचं वय हे अधिक असावं असं अनेकदा पाहिलं आहे. मात्र दोघांच्या वयामध्ये फार मोठं अंतर नसावं, असं आचार्य चाणक्य (Chanakya Niti) सांगतात. त्याचे संसारावर वाईट परिणाम होऊ शकतात.
पती-पत्नीच्या वयातील अंतर किती असावं?
लग्न कोणतंही असुदे लव्ह की अरेंज मॅरेज पण सर्वात कॉमन विचारला जाणारा प्रश्न दोघांच्या वयातील अंतर किती? असा प्रश्न केला जातो. त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, असं आचार्य चाणक्य (Chanakya Niti) सांगतात. या सुखी संसारासाठी आचार्य चाणक्यांनी लग्नानंतर आणि सुखी संसारासाठी काही मूलमंत्र दिले आहेत.
विवाह एक अध्यात्मिक अनुभव आहे. आचार्य चाणक्यांनी (Chanakya Niti) अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. लग्न म्हणजे सामाजिक आणि धार्मिक नाते आहे. विवाह हा एक अध्यात्मिक अनुभव आहे. यशस्वी विवाह म्हणजे पती-पत्नी एकमेकांसोबत शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या संतुष्ट करतात, असं आचार्य चाणक्य सांगतात.
पती-पत्नीत जास्त अंतर नसावे…
विवाह करत असताना पती आणि पत्नीच्या वयातील अंतर फार महत्त्वापूर्ण मुद्दा आहे. पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर नसावे. शारिरीकदृष्ट्या सक्षम पुरूषच आपल्या पत्नीच्या आकांक्षा पूर्ण करू शकतो. अशा परिस्थितीत पती आणि पत्नीमध्ये जर जास्त अंतर असेल तर तो पत्नीला मानसिक आणि शारिरीक सुख देऊ शकत नाही. जर पत्नीला इच्छा पूर्ण झाली नाही तर ती दुसऱ्या पुरूषाकडे आकर्षित होऊ शकते आणि त्यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक नातेसंबंधावर देखील भाष्य केलं आहे, असं म्हणतात की, नवरा बायकोचं नातं हे सात जन्मासाठी आहे. पती-पत्नी हे संसाराच्या गाड्याची दोन चाकं आहेत. त्यातील एकाही चाकाने साथ सोडली तर संसार अंधारात येईल.
News Title – Chanakya Niti | Wife-Husband Age Matter For Married Life
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी ! चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे…, विधानपरिषदेसाठी भाजपची यादी समोर
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विरोधकांनी फडणविसांना घेरलं; सभागृहात जोरदार खडाजंगी
चाहत्यांना धक्का! अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ कॅन्सर
“प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही..”; रिलेशनशिपबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य