मुंबई | सध्या हिवाळा सुरु आहे. राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडली असून सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आता नागरिकही हैराण झाले आहेत. अशातच ऐन थंडीत पावसाची हजेरी पहायला मिळत आहे.
हवामान खात्यानं पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात अवकाळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
पुढील 2 ते 3 दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. त्यामुळे आता 22 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यात हुडहुडी भरली असून पावसाचीही हजेरी पहायला मिळत आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसानं आणि कडाक्याच्या थंडीनं नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. थंडीतही पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे.
थोडक्यात बातम्या –
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ तारखेपासून शाळा सुरु होणार
कोरोनावर कोणती औषधं प्रभावी?; WHOनं दिला मोलाचा सल्ला
बोलण्याची संधी दिली नाही म्हणून महिलेनं केलं ‘हे’ कृत्य, पाहा व्हायरल व्हिडीओ
लसीकरणासाठी हमरीतुमरी; व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही
पुणे पोलिसांना मोठं यश! अखेर 9 दिवसांनी अपहरण झालेला ‘तो’ चिमुरडा सापडला
Comments are closed.