शेतकऱ्यांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही भागात गारपिटीचीही शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. गहू, हरभरा यासह द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठं नुकसान झालं आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

अनेक जिल्ह्यांत  वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला. वीजवितरण कंपनीचे विद्युत खांब, तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

दरम्यान, राज्यात होळीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरतोच आहे. पण आता पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-