राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई | गेल्या महिन्यात परतीच्या पावसानं राज्यात थैमान घातलं होतं. या पावसामुळं राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. पावसानं काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, राज्यात आता पुन्हा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळं राज्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. तसेच राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. त्यामुळं बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत आला आहे.

बाष्पयुक्त वाऱ्यामुळं राज्यातील काही भागांतील थंडी गायब झाली आहे. त्यामुळं ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. बळीराजाची खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच, हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तविल्यानं शेतकरी चिंतेत आले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून पुणे, बीड, कोकण, सातारा, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता पुढच्या 24 तासांत वाढण्याची शक्यता आहे.

हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा तसेच पुणे या भागातं पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळं राज्यातील थंडी कमी झाली आहे. तसेच ऊन्हाचे चटके देखील बसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-