नवी दिल्ली | सध्या देशातील हवामानात सातत्यानं बदल होत असल्याचं जाणवत आहे. सध्या काही ठिकाणी तापमान कमी होऊन कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच आता हवामान खात्यानं(Deapartment OF Meteorology) काही राज्यांत पाऊस (Rain Update)पडेल असा अंदाज वर्तविला आहे.
सध्या हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, डिसेंबर महिन्यापासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत देशातील काही भागांत अत्यंत कमी तापमान राहू शकते. त्यामुळं इथून पुढं देशातील बहुतांश भागात कडाक्याची थंडी पडू शकते.
तसेच वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळं काही भागांत तापमानात कमाल आणि किमान घट होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. काही भागांत थंडीची लाट येण्याचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शुक्रवारी पहाडी भागांमध्ये गारा पडू शकतात. त्यामुळं मैदानी भागातील थंडी वाढू शकते. तसेच कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांत पुढील काही दिवस पाऊस पडू शकतो, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमान सामान्यापेक्षा जास्त असू शकतं, असा अंदाजही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
हरियाणा,चंदीगड, राजस्थान, पंजाब दिल्ली तसेच उत्तर प्रदेशातील काही भागात किमान तापमान आठ ते दहा अंशाच्या दरम्यान आहे. त्यामुळं या भागांत पुढील काही दिवस कडाक्याची थंडी पडू शकते.
महत्वाच्या बातम्या-