पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई | पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्यातील नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर मुंबई ठाणेसह काही भागात गेल्या 24 तासांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान, बुधवारी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ग्रामीण परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.
या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या पावसामुळे शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; H3N2 च्या दुसऱ्या रूग्णाचा मृत्यू
- ‘देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार…’; कार्यकर्त्यांच्या घोषणावर उद्धव ठाकरे हसले
- “इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का?”
- “आम्ही पवारांना नेहमी घाबरुन असतो कारण…”
- ‘दादा तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक’; फडणवीसांचं अजित पवारांना उत्तर
Comments are closed.