बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीहून 12 टक्केहून अधिक पाऊस आहे. त्यात मराठवाड्यात 32 टक्के अतिरीक्त पावसाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान खात्याने आज मध्य महाराष्ट्रात, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेक जिल्ह्यांना आयएमडीने येलो अलर्ट दिला आहे.

मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्याला तर पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे औरंगाबादसह परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूरातील अनेक धरणं दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे.

दरम्यान, मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे आणि सातारा येथे मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणी येथे अतिरिक्त तर जालना येथे तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-  

“मित्र मित्राला मिठी मारणार नाही तर कुणाला मिठी मारणार?”

#सोयाबीन! आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत पण शेतकऱ्यांच्या व्यथा नाही- हेमंत ढोमे

“एक दिवस सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील”

‘माझ्याकडे 500 पुरावे’; छगन भुजबळांविरोधात शिवसेना आमदाराची धाव

“सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला…”; अतुल भातखळकरांची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More