बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली | जुलै महिन्यात पाऊसानं थैमान घातलेलं पाहायला मिळालं. पण मागील काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. यातच आज कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून सक्रीय झाला आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. राज्यात बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, आजपासून पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झालेलं पाहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या –

“पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही”

“तुम्ही नारळ फोडत रहा, निवडणुकीत उमेदवारी मात्र मला मिळो”

पवनदीप राजन ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल!

पत्नीच्या नावावर घर खरेदी कराल तर मिळतील ‘हे’ फायदे; जाणून घ्या अधिक माहिती

“इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि तुम्ही नाव कसलं बदलता”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More