राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!
मुंबई | भारताच्या उत्तर भागात प्री-मान्सून ला सुरूवात झाली आहे. स्कायमेटने काही दिवसांपुर्वी उत्तरेकडील राज्यात हलक्या ते मध्यस्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. तर मैदानी प्रदेशातील काही राज्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला होता. तर आता भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाच्या भितीने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. राज्यात 18 ते 21 मार्चच्या दरम्यान मध्यम स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर हवामान खात्याने काही ठिकाणी वीज आणि गारपीठीची शक्यता सांगितली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल जपून ठेवावा अशा सूचना आधीच देण्यात आल्या आहेत.
18 ते 21 मार्च या तीन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा ते मेघगर्जनेसह पाऊस होणार आहेत. तर विदर्भात काही ठिकाणी गारपिठीचा इशारा देण्यात आला आहे. त्याच बरोबर विदर्भाच्या काही भागात वादळी वाऱ्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहेे. हवामान तज्ज्ञ एस.के,होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
दरम्यान, दक्षिणेकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्यात एकत्रीकरण झाल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. ऐन उन्हाळ्यात झालेला हा हवामान बदल शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.
पाहा ट्विट –
मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वार्यारच्या आंतर क्रिये च्या प्रभावा खाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे । तर विदर्भात मेघ गरजेनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. pic.twitter.com/n3CNsWP5EK
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 15, 2021
थोडक्यात बातम्या-
…तर शिवसेनेची ‘ती’ प्रकरणं बाहेर काढेन- नितेश राणे
“देश नहीं बिकने दूंगा म्हणत मोदी सरकार एक एक करत सर्व विकतंय”
चिंताजनक! पुण्यात कोरोना रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळेना
कोरोना लसीकरणासंदर्भात आनंद महिंद्रांनी मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी
पाॅवर कट बत्ती गुल ; महावितरणाच्या कारवाईनं शेकडो गावं अंधारात
Comments are closed.