शेतकऱ्यांनो… कामं उरकून घ्या! मराठवाड्यासह राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई | उष्णतेचा पारा चढला असताना गेल्या आठवड्यात पावसाने (Rain) अनेक भागात हजेरी लावली. येत्या 48 तासांत राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीय वाऱ्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
हवामान विभागानं वर्तविलेल्या अंदाजानूसार 21 आणि 22 तारखेला तुरळीक प्रमाणात पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यातील काही ठिकाणी 23 तारखेला देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांमध्ये अचानकपणे हवेत गारवा जाणवत आहे. बंगालच्या उपसागरातील हालचालींचा परिणाम राज्यातील भौगोलिक परिस्थितीवर होण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात आपली शेतातील कामं उरकून घेत आहेत. पण काही भागात शेतात पिक उभं आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.
दरम्यान, सध्या राज्यात तापमानाचा पारा चढताना पाहायला मिळत आहे. साधारणपणे 40-42 अंश सेल्सियसपेक्षा तापमान अधिक आहे. काही भागात 30-40 किमी प्रति तासाच्या वेगानं वारं वाहताना देखील पाहायला मिळालं आहे.
थोडक्यात बातम्या –
“नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या”
धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
मोठी बातमी! नवाब मलिकांना ईडीकडून जोर का झटका
“ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत आणि म्हणूनच ते…”
रूसलेल्या नवरदेवाची अजब-गजब मागणी ऐकून सासरेबुवाही चक्रावले
Comments are closed.