‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई| सध्या हवामानात(Weather Update) सातत्यानं बदल होत असल्याचे दिसत आहे. दिवसभर कडक उन्हाळा जाणवत आहे तर रात्री कडक्याची थंडी पडत आहेत. त्यामुळं हवामानातील हे बदल स्पष्टपणे जाणवत आहेत.

त्यातच आता राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत असल्यानं पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात गुरूवारी काही ठिकाणी पाऊस पडला आहे. अजूनही इथं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

कोल्हापूरमध्येही गुरूवारी सकाळी धुके पडले होते. त्यामुळं गुरूवारी संपूर्ण दिवसभर इथं कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वात उच्चांकी तापमानाची सोलापूरमध्ये नोंद झाली आहे. सोलापूरात 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यांतही तापमानात कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं या जिल्ह्यांतही कडाक्याची थंडी पडली आहे.

दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र झाल्याचे दिसत आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगढ, हिमाचल प्रदेश या ठीकाणीही थंडीची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-