मुंबई | संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असून अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
पालघर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर छत्रपती संभाजीनगर, पूर्व विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यांमध्येदेखील ढगाळ वातावरणासह मेघगर्जनेसह ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
सध्या कोकण वगळता इतर महाराष्ट्रात 8 मार्चपर्यंत गडकराटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. 7 मार्चला अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता आहे. मात्र, मुंबईमध्ये याचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही पण अंशत: ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- “…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल”
- शरद पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा एका वाक्यात पाणउतारा, म्हणाले…
- ‘स्वत: मुख्यमंत्री होऊन पोराला…’; ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर
- अदानींसाठी मोठी गुड न्यूज; कंपनीला आले अच्छे दिन
- शिर्डीच्या साईबाबांवरून नवा वाद; कालीचरण महाराजाचा गंभीर आरोप