पुढचे दोन दिवस महत्वाचे; राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता

पुणे | राज्यात दोन दिवस पावसाचे आहे. पुणे (Pune) आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे.

शहरातील हडपसर ,स्वारगेट, कात्रज या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

आज आणि उद्या शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-