बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ 14 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. संपूर्ण राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कोकणासह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. राज्यात पुन्हा एकदा 16 ते 18 दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही संलग्न जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने परभणी, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

यासोबतच नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, वाशिम, अकोला, नांदेड या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रविवारी राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. वातावरणातील आद्रता कमी होत असल्यामुळे लवकरच परतीचा पाऊस संपणार असल्याचं दिसतंय.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांच्या नुकसानीला सामोर जावं लागतंय. राज्यातला परतीचा पाऊस संपून लवकरच थंडीला सुरूवात होणार आहे, असं हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“ऐट राजाची आणि वागणूक भिकाऱ्याची, अशी ठाकरे सरकारची अवस्था”

‘…तर पुन्हा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक करणार’; अमित शहांचा पाकिस्तानला इशारा

वाजपेयींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत वरूण गांधींचा मोदी सरकारवर निशाणा; पाहा व्हिडीओ

“मी रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन, हवं तर गडगडत जाईन, कोणाला काय प्राॅब्लेम?”

‘बास झालं राजकारण, हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं…’; उदयनराजेंचं खुलं आव्हान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More