बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विदर्भात आजही पावसाची शक्यता, ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

पुणे | हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Forecast Report) विदर्भात आजही पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरगांबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

राज्यात काल औरगांबाद, अहमदनगर, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर  नांदेडमध्ये पाऊस झाला होता. विदर्भ मराठ्यात काही भागात गारपीटही झाली होती. त्यामुळे शेतीचं आतोनात नुकसान झालं होतं. त्यानंतर हवामान विभागाने आज पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

ऐन थंडीच्या दिवसात आज 29 डिसेंबर पाऊस पडण्याचा अंदाज, हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात आज  मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात थंडीची लाट सुरु आहे. मात्र आता कडाक्याची थंडी ओसरत असून अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. ऐन थंडीतही पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकही चिंतेत होते. या अवकाळी पावसामुळे लोकांचं बरंच नुकसान केलं आहे. त्यामुळे काही भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

इंधन दरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

Omicronच्या पहिल्या लक्षणाचा प्रसार होण्यापहिलेच व्हा सावधान, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

कमी वयात कोट्याधीश बनलेली उद्योजिका पंखुरी श्रीवास्तव हिचं निधन

“15 लाखांच्या भ्रष्टाचाराला मी भ्रष्टाचार मानत नाही,” भाजप खासदाराच्या ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More