बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 3 तासात राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | गेल्या आठवड्याभरापासून पावसानं राज्यात हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा आता आणखी तीव्र झालेला आहे. पाकिस्ताननं या चक्रीवादळाला ‘गुलाब चक्रीवादळ’ असं नाव दिलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. पुढील तीन तासात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यासोबतच काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेत हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळ आज ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकू शकतं. उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, अजून किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकलं नसताना देखील गोपालपूरमध्ये हवामानात तीव्र बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

चिंताजनक! कोरोनामुळे कुपोषणाचा धोका वाढलाय, डाॅक्टरांचा गंभीर इशारा

“ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”

“बारामती हा महाराष्ट्राचाच भाग आपण तो देखील जिंकू”

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढू- विजय शिवतारे

“जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More