पुढील दोन दिवसांमध्ये ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
पुणे | गेल्या काही दिवसांपासून तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण होते. राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी विलंब देखील लागत होता. त्यातच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. पुण्यात झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साठल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, पावसाच्या आगमनाने थंडावा मिळाल्याने पुणेकर सुखावले आहेत.
शुक्रवारी सकाळपासूनच गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यात मान्सूनचा प्रभाव दिसून येत होता. लवकरच मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. 29 मे रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाले होते. मात्र, वाऱ्यांची गती मंदावल्याने महाराष्ट्रात दाखल होण्यास उशीर झाला होता. शुक्रवारी पुण्यासोबतच अहमदनगर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी महाराष्ट्रात वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, यावर्षी मान्सून वेळेआधीचं दाखल होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र, नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासामध्ये अडथळा निर्माण झाल्याने राज्यात वरूणराजाचे आगमन लांबले होते. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची संपुर्ण कामे उरकली होती. त्यातच आता कोकणामध्ये मान्सूनचे आगमन झाले असून लवकरचं राज्य व्यापेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
I Love Congress म्हणत ‘या’ आमदाराने केलं क्रॉस व्होटिंग!
Rajyasabha Election | भाजपला मोठा झटका, भाजप आमदाराचं काँग्रेसला मतदान
President Election | राष्ट्रपतींना महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार
एकनाथ खडसेंचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी! दिल्ली पोलिसांचा असदुद्दीन ओवैसींना दणका
Comments are closed.