महाराष्ट्र मुंबई

पुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | मुंबई, ठाण्यात गेल्या 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर पश्चिम उपनगरात  मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण आता पुढच्या 24 तासांत मुंबई आणि शहरालगतच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यातल्या काही भागात हवामान खात्याने पावसाचा पुन्हा एकदा अलर्ट दिलाय. मुंबई ठाणे आणि कोकणात सोमवारी मंगळवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि बीड इथे मेघगर्जनेसह पुढच्या 24 तासांमध्ये दमदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे अशी शक्यती व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे”

“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”

आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण!

“मनमोहन सिंगांबद्दल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

‘रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचा’; या दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या