राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई | राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असणाऱ्या नागरिकांना वरूणराजा बरसल्याने थंडावा मिळत आहे.राज्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि गारपीटीसह पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. राज्यभरात मान्सून सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यातच पुढील पाच दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
राज्यातील काही भागांमध्ये येत्या पाच दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच कोकणामध्ये पावसाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी कोकणामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मुंबई उपनगर आणि मध्यमहाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. 15 जूनपर्यंत पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या काही भागात पाऊस पडला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण असून काही भागांत रिमझिम सरी बरसल्या. गेल्या दोन दिवसात पुणे परिसरामध्ये झाडपडीच्या देखील घटना घडल्या आहेत. राज्यात यंदा पावसाचे उशीरा आगमन झाले असले तरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विजांच्या लखलखाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
थोडक्यात बातम्या-
“आमचे 106 त्यांच्या 170 वर भारी; तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत”
“अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही; एका राज्यसभेने पुन्हा मुख्यमंत्री बनता येत नाही”
वडिल धनंजय महाडिकांच्या विजयानंतर लेकाला अश्रू अनावर, सर्वांसमोर बाबांना मारली कडाडून मिठी
किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सूचक इशारा, म्हणाले…
‘…तर एक हजार कोटी देईन’; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत
Comments are closed.