बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | काही दिवसांपुर्वी राज्यभरात पावसाने थैमान घातलं होतं. गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पावसानं चांगलाच मुक्काम ठोकल्याचं पहायला मिळत होतं. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र झाल्यानं राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयएमडीने दिलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यात 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून पुढचे 3 दिवस काही ठिकाणी गडगडाटासहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच नंतर शेतीची कामं करावी, अशी सुचना देखील करण्यात आली आहे.

रविवारी राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव या चार जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्याच्या इतरही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, यंदा परतीचा पाऊस लांबणीवर पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता संधी मिळणार आहे.

थोडक्यात बातम्या-

ह्रद्यस्पर्शी! ‘या’ लहानग्याची पंतप्रधान मोदींना आर्त हाक; पाहा व्हिडीओ

पुणे बंद! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

…अन् भर कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींनी काढला महिलेचा मास्क; पाहा व्हिडीओ

अभिनेता मनोज वाजपेयींचे वडिल रूग्णालयात दाखल, प्रकृतीबाबतची माहिती आली समोर

‘2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…’; अभिनेत्री कंगणा राणावतच्या मोदींना खास शुभेच्छा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More