मुंबई | महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट असल्याची माहिती हवामान विभागाने (Weather Department) दिलीये. फेब्रुवारीमध्ये उन्हाचा कडाका असह्य झाला होता. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीलातचा हवामानात बदल झाला आहे.
आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चार ते सहा मार्चपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसून शेतकऱ्यांचं (Farmer) मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसामुळं पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. द्राक्ष काढणीला आल्याने त्यातच पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या गव्हाची काढणी सुरु असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोबतच या पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर!
- हृदयद्रावक घटना! वडिलांच्या मृत्यूदिवशी त्याने दिला गणिताचा पेपर
- तरूणांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय
- ‘…तेव्हा सगळ्यांना मोठा शॉक बसेल’; एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
- आमदार राम सातपुतेंकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; सभागृहात राडा