मुंबई | राज्यात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढत आहे. अनेक भागातील तापमानात कमालीची वाढ झाल्याने नागरिकांना आत्तापासूनच मान्सूनचे वेध लागले आहेत. मान्सूनची अतुरतेने वाट बघणाऱ्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
महाराष्ट्रात यंदाचा मान्सून चांगला होणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा मान्सूनची सुरूवात चांगली होणार असून जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित आहे, असंही स्कायमेटकडून सांगण्यात आलं आहे.
स्कायमेटच्या अंदाजानूसार यावर्षी भारतात 98 टक्के पाऊस राहण्याची शक्यता आहे. जुन ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत 880.6 मिलीमिटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 फेब्रुवारी 2022 ला स्कायमेटनं पहिला मान्सून अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर त्यांनी वेबसाईटवर अधिकृतरित्या माहिती दिली आहे.
दरम्यान, गतवर्षी मान्सूनचा प्रभाव शेतकऱ्यांसाठी समाधानकारक राहिला होता. पण सप्टेंबरच्या आसपास मान्सून पिकांसाठी अधिक उपयुक्त असल्यानं शेतकरी सप्टेंबरमध्ये मान्सूनचा जोर वाढण्याची अपेक्षा करतात.
थोडक्यात बातम्या-
“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”
मोदी-बायडन यांच्यात वर्च्युअल बैठक; रशिया-युक्रेन युद्धाबाबत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
“लोकांना कायद्यापासून पळू नका म्हणणारेच आता #*# पाय लावून पळतायंत”
पाकच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्गीय ब्राम्हण असतात”
Comments are closed.