देशात ‘हा’ आजार घालतोय धुमाकूळ; WHO ने दिला इशारा

Virus l देशातील अनेक राज्यांमध्ये चांदीपुरा व्हायरस वेगाने पसरत आहे. गेल्या 20 वर्षांत भारतात हा धोकादायक आजार झपाट्याने वाढल्याचे WHO ने मान्य केले आहे. अशातच आता त्याचा मृत्यूदर हा 33 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आत्तापर्यंत चांदीपुरा व्हायरसची 245 प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत. त्यामुळे ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे.

या व्हायरसचा 20 वर्षांतील सर्वात मोठा उद्रेक :

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नुसार, जूनच्या सुरुवातीपासून ते 15 ऑगस्टपर्यंत या आजारामुळे 82 जणांचा मृत्यू झाला आहे. चांदीपुरा विषाणूचा पुढील प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वेक्टर नियंत्रण आणि माश्या, डास आणि टिक्स यांच्या चाव्यापासून बचाव करण्याची शिफारस केली आहे.

15 ऑगस्ट दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने AES ची 245 प्रकरणे नोंदवली आहेत. ज्यामध्ये 82 जणांच्या मृत्यूंचा समावेश आहे. चांदीपुरा विषाणूचा सध्याचा उद्रेक गेल्या 20 वर्षांतील सर्वात मोठा आहे.

Virus l WHO ने इशारा दिला :

मागील प्रकरणे पाहता अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रकरणे समोर येत आहेत. गुजरातमध्ये दर चार ते पाच वर्षांनी CHPV प्रकरणांमध्ये वाढ होते. हे सँडफ्लाय, डास आणि टिक्स यांसारख्या वेक्टरद्वारे पसरते. CHPV संसर्गाचा CFR जास्त आहे (56-75 टक्के) आणि या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही.

WHO ने म्हटले आहे की, चांदीपुरा आजाराचे विषाणू दिवसेंदिवस कमी होत आहेत. मात्र याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. कारण पाऊस पडल्यानंतर डास आणि माश्यांमुळे रोगराईचा धोका वाढतो. त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. तसेच या आजाराचे वेळीच निदान केले नाही तर मृतांची संख्या देखील वाढू शकते. हा रोग मुख्यतः 15 वर्षांपेक्षा लहान मुलांना होत आहे. या आजारामध्ये ताप येणे हे मुख्य कारण आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे 48 ते 72 तासांच्या आत दिसून येतात.

News Title : Chandipura Virus Symptoms

महत्त्वाच्या बातम्या-

“हार्दिक पांड्यावर माझं प्रेम, तो माझा..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा

आयफोनला विसरा! 108MP कॅमेरा असलेला भन्नाट फोन लाँच; किंमत फक्त…

महिन्याच्या शेवटी दिलासा, सोन्याचे भाव उतरले; काय आहेत सध्या किमती?

मुंबईतली म्हाडाची घर तब्बल ‘इतक्या’ लाखांनी कमी होणार; फडणवीसांनी केली घोषणा

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, विकी म्हणाला, तिने मला…