Chandra Grahan 2024 l चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. अशातच यंदाच्या वर्षीच शेवटचं चंद्रग्रहण हे या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा राहू चंद्राला त्रास देतो तेव्हा ग्रहण होते, ही एक अशुभ घटना मानली जाते. मात्र या वर्षीच हे चंद्रग्रहण नेमकं कधी आणि केव्हा होणार तसेच भारतात दिसणार आहे का? हे सर्व आज आपण जाणून घेऊयात…
2024 चे शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे? :
या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपद पौर्णिमेला होणार आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचत नाही. यामुळे चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6.11 वाजता सुरू होईल आणि सकाळी 10.17 वाजता संपेल. हे ग्रहण एकूण 4 तास 6 मिनिटे चालणार आहे.
तसेच सप्टेंबरमध्ये होणाऱ्या चंद्रग्रहणासाठी सुतक पाळले जाणार नाही. कारण हे चंद्रग्रहण दिवसा होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार उघड्या डोळ्यांनी दिसणारे ग्रहण हाच सुतक काळ मानला जातो. याशिवाय चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. या काळात धार्मिक विधी केले जात नाहीत. मात्र 18 सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी देखील वैध राहणार नाही.
Chandra Grahan 2024 l कुठे दिसणार चंद्रग्रहण :
या वर्षीचे दुसरे चंद्रग्रहण उत्तर-दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आर्क्टिक, युरोप, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, अंटार्क्टिका आणि अटलांटिक महासागरात दिसणार आहे.
18 सप्टेंबरला होणारे चंद्रग्रहण सर्व राशीच्या लोकांना प्रभावित करेल, परंतु काही राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव पडू शकतो, यामध्ये मेष, कर्क राशीचा समावेश आहे तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
News Title : Chandra Grahan 2024
महत्वाच्या बातम्या-
शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरूंना द्या खास शुभेच्छा; शिक्षक होतील खूश
भाद्रपद महिन्यात नशिब फळफळणार, या ‘5’ राशीवाल्यांचं भाग्य उजळणार!
रुपाली चाकणकरांसाठी गुडन्यूज?, अजित पवार घेणार मोठा निर्णय
सॅमसंग कंपनीने लाँच केला स्वस्तात मस्त फोन; जाणून घ्या किंमत