चंद्रग्रहणात चुकूनही या गोष्टींचा वापर करू नका; जाणून घ्या वेळ

Chandra Grahan 2024 l असे म्हटले जाते की चंद्राच्या पूर्ण चक्रात 28 दिवसांत जे घडते ते ग्रहणानंतर दोन ते तीन तासांच्या आत चंद्रग्रहणाच्या वेळी सूक्ष्म स्वरूपात घडते. चंद्राच्या चक्रांचा शारीरिक, मानसिक आणि ऊर्जा स्तरावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या वेळी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. अशातच सोमवारी, 25 मार्च 2024 रोजी चंद्रग्रहण आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात चंद्रग्रहण काळात कोणत्या गोष्टींचा वापर करावा, ग्रहण काळात कोणत्या गोष्टी करू नयेत.

Chandra Grahan 2024 l चंद्रग्रहण 2024 किती काळ चालेल :

25 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या पेनम्ब्रामध्ये प्रवेश करतो आणि तिथून बाहेर येतो तेव्हा त्याला पेनम्ब्रा म्हणतात. हे चंद्रग्रहण सकाळी 10:23 ते दुपारी 03:2 पर्यंत असणार आहे.

चंद्रग्रहण काळात या गोष्टी करू नका :

चंद्रग्रहण काळात अन्न का खाऊ नये : चंद्रग्रहणाच्या काळात चंद्राची किरणे दूषित होतात ज्यामुळे आपले अन्नही खराब होऊ शकते. अशा स्थितीत चंद्रग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे निषिद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते, चंद्रग्रहणाच्या वेळी शिजवलेले अन्न सामान्य दिवसापेक्षा जास्त वेगाने खराब होते. त्यामुळे ग्रहणाच्या काळात अन्न खाऊ नये.

चंद्रग्रहण काळात घरामध्ये का राहावे – धार्मिक ग्रंथानुसार चंद्रग्रहण काळात राहू-केतूमुळे नकारात्मक शक्तींचा प्रसार तीव्र होतो. ज्याचा व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो, याशिवाय चंद्राच्या प्रदूषित किरणांचाही व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. यामुळेच ग्रहण काळात घरामध्ये राहून मंत्रांचा जप करण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव कमी करता येईल.

Chandra Grahan 2024 l या गोष्टी करणे टाळा :

चंद्रग्रहण काळात चाकू, कात्री किंवा कोणत्याही धारदार शस्त्राचा वापर अजिबातही करू नका. यामुळे दोष निर्माण होतो. चंद्रग्रहणाच्या वेळी झाडांना स्पर्श करणे टाळावे.

तसेच शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या सुतक काळात दात आणि कंगवा केस स्वच्छ करू नयेत. सुतक काळापासून ग्रहण संपेपर्यंत झोपणे टाळावे. धार्मिक दृष्टिकोनातून सुतक काळात कोणत्याही पवित्र मूर्तीला स्पर्श करणे अत्यंत अशुभ मानले जाते.

News Title – Chandra Grahan 2024

महत्त्वाच्या बातम्या

शनिवारच्या दिवशी चुकूनही ‘या’ 5 गोष्टी करू नका अन्यथा…;

श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे तगडा उमेदवार देणार; ‘या’ व्यक्तीचं नाव चर्चेत

केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी उचललं मोठं पाऊल!

महायुतीला मोठा धक्का; विजय शिवतारेंनी केली मोठी घोषणा

‘तिहारचा बॉस, मी तुमचं तुरुंगात स्वागत करतो’; सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा