चंद्राबाबू अर्थसंकल्पावर नाराज, भाजपची साथ सोडणार?

विजयवाडा | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे सर्वोसर्वा चंद्राबाबू नायडू अर्थसंकल्पावर नाराज असल्याचं कळतंय. त्यांनी शुक्रवारी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावलीय. 

चंद्राबाबू नायडू यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज होत यापूर्वीच भाजपची साथ सोडण्याचे संकेत दिले होते. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. 

अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशची उपेक्षा झाली, अपेक्षित निधी आंध्र प्रदेशला मिळाला नाही त्यामुळे चंद्राबाबू नाराज असल्याचं कळतंय. तेलगु देसमने भाजपची साथ सोडण्याची घोषणा केली तर तो भाजपसाठी सर्वात मोठा धक्का असेल कारण यापूर्वीच शिवसेनेनं स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय.