बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्राबाबू नायडूंना ममता दीदींना भेटायचं होतं पण, ममता त्यांना म्हणाल्या…

नवी दिल्ली |  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा निकालाआधीच विरोधी पक्षांची एकजूट करायला आणि त्यांची मोट बांधायला सुरूवात केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नायडूंना भेटायचं होतं पण ममतांनी नायडूंना भेटण्याची वेळ दिली नाही. निवडणूक निकालानंतर आपण बोलूया, असं ममतांच्या वतीने नायडूंना कळवण्यात आलं.

नायडूंनी आज सकाळीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तर थोड्या वेळापूर्वी सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली.

दरम्यान, उद्या शेवटच्या टप्प्यातील निवडणूक पार पडत आहे. त्याअगोदरच विरोधी पक्ष संभाव्य निकाल लक्षात घेऊन तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

-निवडणूक निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना!- धनंजय मुंडे

-हे एक दिवस देशाचा तालिबान करतील; आनंद महिंद्रा भाजप नेत्यांवर भडकले

-ऑक्सफर्ड डिक्शनरी म्हणते, राहुल गांधी खोटं बोलत आहेत; मोदींच्या टीकेवर राहुल तोंडघशी!

-मोबाईल आणि सोशल मीडियामुळे युवकांमध्ये सैराट वृत्ती वाढत आहे- नांगरे पाटील

-तू खिंच मेरी फोटो!… केदारनाथ मंदिरातील फोटोंवरुन मोदींची सोशल मीडियात खिल्ली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More